धाराशिव - धाराशिव जिल्हा उन्हाळ्यात पाणीटंचाईने होरपळला होता, पण आता टँकर लॉबी मात्र 'बिल'टंचाईने त्रस्त आहे. जिल्हा परिषदेकडे १ कोटी ३६ लाखांचे बिल थकले असून, टँकरवाल्यांची 'वाहन फिटनेस'पेक्षा 'बिल फिटनेस'ची चिंता वाढली आहे.
अधिकारी म्हणतात, "सर्टिफिकेट आणा, बिल घेऊन जा," पण आरटीओ सर्टिफिकेट द्यायला तयार नाही. मग टँकर लॉबीने 'टक्केवारी' वाढवून देण्याचे कबूल केले, पण अधिकारी पत्रकारांना घाबरतात, "बातमी आली तर आम्ही गोत्यात येऊ!"
मग ठरले, बातमी देणाऱ्या पत्रकारांना 'गप्प' करायचे. एका पत्रकाराने 'जबाबदारी' घेतली आणि तब्बल ७ लाख मागितले! तडजोडीअंती १ लाखात 'बातमी' विकली गेली. या पत्रकाराने गौण खनिजातून 'मलिदा' मारून चारचाकी गाडी घेतली आहे, आता टँकर लॉबीच्या 'काचेवर' आयफोन घेण्याचे स्वप्न पाहत आहे.
पण इथेच 'ट्विस्ट'! बाकी पत्रकारांनाही प्रत्येकी एक लाख हवे आहेत. त्यामुळे 'बातमी' अडली आहे आणि टँकर लॉबी 'हवालदारांच्या घोड्यांप्रमाणे' पेंड खात बसली आहे.
- ब्रेकिंग न्यूज: धाराशिव जिल्ह्यात 'बिल' आणि 'बातमी' यांच्यात नवी 'तडजोड' सुरू! या 'खेळात' पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS