धाराशिवात हल्ली राजकारणाच्या पोळ्याला तूप लागलं की कुणाच्यातरी पोटात कावीळ व्हायला लागतेच! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नियुक्तीपासून काहींच्या पित्ताला इतका भडका उडालाय की, त्यांचं नाव ऐकूनही त्यांना अॅसिडिटी होते म्हणे! त्यात भर म्हणजे एक ‘एक दिवसीय’ पीए साहेब, ज्यांनी पदाचा एक दिवसाचा अनुभव घेऊन अख्खं डिपार्टमेंटच एक्स्पोज करण्याचा घाट घातलाय – आणि तोही ‘श्रद्धा’ पॅटर्नमध्ये!
हो, हो... हाच तो पॅटर्न! म्हणजे आधी स्वतःच एखादं काल्पनिक कांड रंगवायचं, मग ते फेसबुकवर पेरायचं, व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करायचं, आणि शेवटी ‘माझं काही चुकलं नाही हो!’ अशा निरागस चेहऱ्याने फिरायचं. अगदी सिरीयसली घेतलं तर Netflixवर सस्पेन्स थ्रिलर काढता येईल इतका कंटेंट आहे इथे!
या महाशयांनी एक दिवस पीए म्हणून काम केलं, ऑर्डर निघाली आणि रद्द झाली... आणि त्या दिवसाचा त्रास इतका झाला की, थेट माजी आमदार, ओएसडी, सध्याचे पीए आणि संपूर्ण प्रशासन यांच्यावर ‘बदनामीचे शिंतोडे’ उडवले गेलेत. म्हणजे काय, पोरगी नाही म्हणाली तर लग्नात आंबट शिजवलं, असा काहीसा मामला!
हे ‘तात्कालीन पीए’ आजही दरम्यान दरम्यान येऊन नेत्यांजवळ आपलं ‘खोटं पुराण’ सादर करतायत. त्यांचं म्हणणं असं की, "माझ्या गोड कथांवर विश्वास ठेवा... आणि त्या दुसऱ्यांचं बघून सोडून द्या!" लोकांनी नाव ठेवायला सुरुवात केलीय – 'एक दिवसाचा पीए ते बदनामीचा मास्टरमाईंड!'
गमतीचा भाग म्हणजे, या पीए साहेबांनी पूर्वी 'टोल घेऊन माया जमवली' अशीही अफवा आहे. आणि आता मात्र ते, ‘मला पीए बनवलं नाही म्हणून मी रडतोय’ या भावनेतून जणू ‘राजकीय रामायण’च लिहायला घेतलंय!
त्यांची अवस्था म्हणजे – “सांगून न मिळालं, म्हणून आता ओरडून घेणार!”
आणि खरं सांगायचं तर, त्यांचं हे वागणं पाहून जनता म्हणते – "स्वतः पाय घसरले आणि आता जिन्यालाच दोष!"
शेवटी एवढंच म्हणावं लागेल...
‘स्वीय सहाय्यक न होता, तेव्हाच हा साहेब वैयक्तिक झाले... आता त्यांनी स्वतःच्या कथांना 'श्रद्धा'ने 'नांद'वायला सुरुवात केली आहे!’
बाकी ‘श्रद्धा’ पॅटर्नवाल्यांना एकच विनंती – कृपया तुमच्या सीरियलला इंटरवल तरी द्या!
COMMENTS