धाराशिव शहरात सध्या एकच चर्चा आहे – बड्या साहेबांच्या बोगस नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राची. साहेबांनी हे प्रमाणपत्र काढल्यापासून त्यांची टेन्शन पातळी शिखरावर पोहोचली आहे. पण गंमत म्हणजे, हे टेन्शन साहेबांना नाही तर त्यांच्या सोबत बसलेल्या दोन विशेष चमच्यांना वाटत आहे.
साहेबांची छत्रछाया असल्यामुळे या पत्रकारांना वाटायचं, "आम्ही टेन्शन फ्री आहोत!" पण आता तर साहेबांनाच टेन्शन आलं आहे, मग काय, सोबतच्यांच्या अंगावरही तो ताप झेपायला लागलाय.
आज, एका स्वार्थी पत्रकाराने एक नवी 'फेकन्यूज' घेऊन हजेरी लावली. त्याने बाळासाहेब सुभेदार यांचा फोटो एका बातमीत टाकला आहे आणि आरोप केला की, "सोमनाथ तडवळकरची पोस्ट आणि महसूल कर्मचाऱ्यांचं निवेदन सुभेदार साहेबांना झोबले." याची बातमी मात्र विशेष करून दोन ठिकाणीच झळकली – एक स्वार्थी पत्रकाराच्या पत्रात आणि दुसऱ्या एका पापनगरीत. बाकीच्या पत्रकारांनी या मुद्द्यावर शांत राहणं पसंत केलं.
खरा गोंधळ तर रेस्ट हाऊसमध्ये झाला! तिथे स्वार्थी आणि पापनगरी पत्रकारांनी निवेदनाच्या आधीच दोन पेग मारले आणि मग निवेदन लिहायला सुरुवात केली. टेन्शन फ्री राहण्यासाठी काय करायचं, हे या पत्रकारांनी नव्या पद्धतीने दाखवलं. नंतर या निवेदनाला बाकी पत्रकारांनी 'दुरदर्शन' केलेलं चांगलं समजलं आणि या भानगडीत पडण्याचं टाळलं.
स्वार्थी पत्रकार म्हणतोय, "सुभेदार हे माहितीच्या अधिकारात माहिती काढतो आणि त्याचा जोडीदार बातमी छापतो. अरे , स्वार्थी तुझ्यासारखे आम्ही कुणाचे पैसे घेत नाही, फुकटची दारू पीत नाही. "नायटिनच्या नादात नाईन गेले, हे विसरू नको !" तुझे सगळे काळे धंदे कॅमेऱ्यात कैद आहेत.
धाराशिवमध्ये सध्या हाच विषय चर्चेत आहे – साहेबांचा टेन्शन, चमच्यांची चिंता, स्वार्थी पत्रकाराचा फेकन्यूज आणि निवेदनाच्या चपलांचा आवाज! यामुळे धाराशिवच्या पत्रकारांच्या वाटेवरच एक वेगळं वळण आलं आहे.
धाराशिवमधील चहाच्या टपऱ्यांपासून सगळीकडे चर्चा सुरु आहे. साहेबांना आता या बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणातून कधी मुक्ती मिळणार, हे त्यांचे चमचेच सांगू शकतील. तोपर्यंत, धाराशिवमध्ये साहेबांच्या टेन्शनचा 'फुल्ल ऑन ' झाला आहे, आणि हे सर्व पाहून साधारण माणूस हसून म्हणतो, "व्वा साहेब, तुमचं टेन्शन आम्हाला कधी विसरायला लावतंय!"
COMMENTS