तुळजापूर: भारत मुरलीधर देवकर, रा. कार्ला, ता. तुळजापूर यांच्या तुळजापूर येथील आडत दुकानावर दि. 26.10.2020 रोजी भिमराव बाबुराव टकले, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर यांनी सोयाबीन विक्री केले होते. त्याचे 75,000 ₹ मोबदला रक्कम भारत देवकर यांनी ऑनलाईन पध्दतीने भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर स्थलांतरीत करतांना अनावधानाने शुन्य जास्त लिहीला त्यामुळे 75,000 ₹ ऐवजी 7,50,000 ₹ अशी रक्कम स्थलांतरीत झाली. अशा प्रकारे 6,75,000 ₹ वाढीव रक्कम भिमराव टकले यांच्या बँक खात्यावर जमा झाली. हा प्रकार लक्षात येताच भारत देवकर यांनी भिमराव यांना फोन करुन ही हकीकत सांगीतली व अनावधानाने जास्त दिली गेलेली 6,75,000 ₹ रक्कम परत करण्यास सांगीतले परंतु भिमराव टकले यांनी रक्कम परत करण्यास मनाई केली. अशा मजकुराच्या भारत देवकर यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
नळदुर्ग: धनु चव्हाण, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी पुर्वीच्या भांडणावरुन दि. 28.10.2020 रोजी 21.00 वा. सु. अणुदर येथील अजय पॅलेस हॉटेल येथे गावकरी- रवी पंडीत भोसले यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रवी भोसले यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फेसबुक, व्हाट्सॲपवर नग्न छायाचित्रे टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद - बदनामी करण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तरुणांची (नाव गोपनीय) नग्न छायाचित्रे व्हाट्सॲप व फेसबुक या सोशल माध्यमांवर दि. 26 ते 29.10.2020 रोजीच्या कालावधीत 3 मोबाईल क्रमांकाद्वारे प्रसारीत करण्यात आली. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणाने दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 3 मोबाईल क्रमांक वापरकर्त्यांविरुध्द भा.दं.सं. कलम- 500 आणि माहीती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 (ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS