धाराशिव - धाराशिव शहर आणि जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या आणि दरोड्यात मोठी वाढ झाली आहे. या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल गुन्हेगारास जेरबंद केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हेह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलींग करीता रवाना होवून तामलवाडी येथे आले असता पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे पिंटु जगन्नाथ उर्फ जग्या भोसले, रा. कोरफळे ता. बार्शी जि. सोलापूर याने व त्याच्या अन्य साथीदारांनी धाराशिव जिल्हृयात बऱ्याच ठिकाणी चोऱ्या व दरोड्या सारखे गुन्हे केले आहेत,व तो धाराशिव जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात फरार आहे व तो सध्या वैराग मार्गे सोलापूर येथील पुणा नाका येथे आहे.
ही माहिती मिळाल्यावरुन पथकाने सदर ठिकाणी जावून बातमी मधील नमुद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवून त्याचे कडे गुन्ह्यासंबंधाने चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासत घेवून विचारपुस केली असता त्याने सागिंतले की, मी व माझे इतर सहा साथीदार यांनी मिळून तुळजापूर खुर्द गावालगत असलेल्या घरातुन रोख रक्कम 2,00,000₹ व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगीतल्याने गुन्हे अभिलेखाची पाहणी करता 1) पोलीस ठाणे तुळजापूर गुरनं 176/2024 कलम 395 भा.दं.वि.सं, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण गुरनं 152/2023 कलम 395, 397 भा.दं.वि.सं.,258/2023 कलम 457, 380 भा.दं.वि.सं प्रमाणे गुन्हे नोंद असुन नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्याने दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील एकुण 15,000 ₹ किंमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दि. 26.06.2024 रोजी जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
COMMENTS