यावेळी महासंघाच्या कोषाध्यक्ष रेणुका आव्हाड, सरचिटणीस सुनिता शिरसागर, कार्याध्यक्ष कांताबाई खांडेकर, तालुकाध्यक्ष रंजना धोंगडे उपस्थित होत्या.
किमान २१ हजार रुपये वेतन दरमहा त्वरित लागू करावे अन्यथा १ जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही परिचरांनी दिला आहे.
स्त्री परिचर महिलांच्या या आहेत प्रमुख मागण्या आरोग्य उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अंशकालीन स्री परिचर महिलांना किमान २१ हजार रुपये वेतन दरमहा त्वरित लागू करावे, अंशकालीन नावात बदल करावा, दरवर्षी गणवेश मिळावा, दरवर्षी भाऊबीज निमित्त २ हजार रुपये मिळाले पाहिजेत, दरवर्षी अपघात विमा योजना लागू करावा, मानधन थकीत न ठेवता दर महिन्याच्या १ तारखेला मानधन अदा करावे अशा विविध मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
COMMENTS