१२३ नव्याने बाधित सापडल्याने खळबळ
उस्मानाबाद - कोरोना विषाणूने बाधित झालेल्या नवीन रुग्णांची संख्या १२३ ने वाढली असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक होऊ लागल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. तर ४४५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांपैकी आज ३९ व आजपर्यंत १६ हजार ९३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के आहे. तर कळंब तालुक्यातील आडसुळवाडी येथील एका ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आजपर्यंत ५८९ रुग्ण दगावले असून मृत्यूचे प्रमाण ३.२९ टक्के आहे.
जिल्ह्यातील २५३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात असलेल्या कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ३० नमुने पॉझिटिव्ह व ७ नमूने संदिग्ध तर २१६ नमुने निगेटीव्ह आढळले आहेत.
तसेच १३७४ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असून यापैकी ९३ पॉझिटीव्ह व १२८१ नमूने निगेटीव्ह आढळले आहेत. तर आजपर्यंत १ लाख ३८ हजार २१४ जणांची स्वॅब व ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७ हजार ९६५ जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १२.९९ टक्के आहे. तसेच स्वॅब व ॲन्टिजेनद्वारे पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - (१-५३) ५४, तुळजापूर - (०-४) ४, उमरगा - (८-१५) २३, लोहारा - (१-२) ३, कळंब - (३-६) ९, वाशी - (११-५) १६, भूम -(६-०) ६ व परंडा (०-८) ८ अशी एकूण (३०-९३) १२३ रुग्ण संख्या आहे.
COMMENTS