उस्मानाबाद - हरवलेल्या व चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनीचा शोध सायबर पोलीस ठाण्यामार्फत निरंतर घेतला जातो. अशाच एका हरवलेल्या फोनच्या शोधात असणाऱ्या स्था.गु.शा. च्या पथकाने 20 जानेवारी रोजी शिरुर, जि. पुणे येथील सचिन जिगनु पवार हा सध्या राहत असलेल्या उस्मानाबाद शहर बसडेपो परिसरातील सासरवाडीच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलीसांना उस्मानाबाद शहर गु.र.क्र. 366 / 2020 व 22 / 2021 मध्ये चोरीस गेलेले 2 स्मार्टफोन आढळले. यावरुन पथकाने सचिन पवार यास त्या स्मार्टफोनसह ताब्यात घेउन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. ही कामगीरी स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोन- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, मनोज मोरे, रंजना होळकर यांच्या पथकाने पार पाडली आहे.
2 गुन्ह्यांतील 3 पाहिजे आरोपी अटकेत
ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 316 / 2019 भा.दं.सं. कलम- 324, 143, 147, 148, 149, 504 या बेकायदेशीर जमाव जमवून मारहाणीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- 1)शिवाजी नारायण बगाडे, वय 32 वर्षे 2)रवी शंकर शिंदे, वय 31 वर्षे, दोघे रा. किणी, ता. उस्मानाबाद या दोघांना स्था.गु.शा. चे सपोनि- श्री निलंगेकर, पोना- गव्हाणे, पोकॉ- पांडुरंग सावंत, अशोक ढगारे यांच्या पथकाने 19 जानेवारी रोजी किणी शिवारातून ताब्यात घेउन ढोकी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.
तर शिराढोन पो.ठा. गु.र.क्र. 206 / 2020 या अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी- अक्षय खांडेकर, रा. बोरगाव (बु.), ता. कळंब यास 20 जानेवारी रोजी पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री निलंगेकर, पोना- टेळे, पोकॉ- ढगारे, सावंत, बलदेव ठाकुर, व शिराढोन पो.ठा. चे सपोनि- श्री नेटके, पोहेकॉ- गवळी, पोना- पठाण यांच्या संयुक्त पथकाने कळंब शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
रस्त्यात धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या 7 चालकांवर पोलीसांची कारवाई
रहदारीस अडथळा व धोका होईल, अपघाताची शक्यता निर्माण होईल अशा रितीने रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या 5 चालकांविरुध्द 19 जानेवारी रोजी भा.दं.सं. कलम- 283 अन्वये 5 गुन्हे उस्मानाबाद पोलीसांनी नोंदवले.
यात 1)ज्ञानेश्वर माने 2)नवनाथ इंगळे 3)कमलाकर मोरे 4)गोविंद ढोले, चौघे रा. एकोंडी, ता. उमरगा 5)परमेश्वर घोडके, रा. उमरगा या सर्वांनी उमरगा शहरातील रहदारीच्या रस्त्याच्या मध्यभागी आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा उभे केल्याबद्दल उमरगा पो.ठा. येथे 5 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले.
तर 6)अविनाश वीर, रा. तुगाव, ता. उस्मानाबाद 7)प्रतिक जोगदंड, रा. गोरेवाडी, ता. उस्मानाबाद या दोघांनी ढोकी येथील पेट्रोल पंप चौकातील रस्त्याच्या मध्यभागी आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा वाहन उभा केल्याबद्दल ढोकी पो.ठा. येथे 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले.
COMMENTS