ओटीपी नंबर दिल्यामुळे ७१ हजार खात्यावरून गायब
कळंब: उस्मानाबाद जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कळंब तालुक्यातील हावरगाव येथील एका महिलेची एका हॅकरने ऑनलाईन फसवणूक करून ७१ हजार रुपयाला चुना लावला आहे.
श्रीमती सुनिता सतिश कोल्हे, रा. हावरगांव, ता. कळंब यांच्या भ्रमणध्वनीवर दि. 18.04.2020 रोजी एका अनोळखी क्रमांकावरुन कॉल करणाऱ्या व्यक्तीने, “तुमच्या क्रेडीट कार्डची उधारी मर्यादा वाढवायची असल्यास तुमच्या क्रेडीट कार्ड वरील पुढील व मागील क्रमांक सांगा.” असे सांगीतले. यावर सुनिता कोल्हे यांनी काहीएक विचार न करता ती माहिती कॉल करणाऱ्या अज्ञात ईसमास दिली. यावेळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर 71,557.96 ₹ इतर खात्यात स्थलांतरीत होण्याकरीता एक ओटीपी संदेश आला. सुनिता कोल्हे यांनी तो संदेश वाचून समजावून न घेता त्यातील ओटीपी त्या समोरील व्यक्तीस सांगीतला. अशा प्रकारे त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन नमूद रक्कम इतर खात्यावर स्थलांतरीत झाली असल्याचे सुनिता कोल्हे यांच्या सुमारे 8 महिन्यानंतर लक्षात आले. अशा मजकुराच्या सुनिता कोल्हे यांनी आज दि. 07.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जिल्हयात दोन चोऱ्या
बेंबळी: राजेश कांबळे, रा. अनदोरा, ता. औसा, यांनी महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम.एच. 13 एएन 4337 हे दि. 06.12.2020 रोजी 14.30 वा. सु. पाटोदा बाजार येथे ठेवलेले असतांना ते अज्ञात चोरट्याने चोरले आहे. अशा मजकुराच्या राजेश कांबळे यांनी आज दि. 07.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: किरण कवडे, रा. वाशी यांचे पारा गावात ‘बालाजी किराणा’ दुकान आहे. त्या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 06 व 07.12.2020 रोजी रात्री तोडून दुकानातील गल्ल्यातील सुमारे 30,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या किरण कवडे यांनी दि. 07.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS