उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याचे प्रमाण वाढले असून, पोलीस यंत्रणा सुस्त झाल्यामुळे चोरांचे धाडस वाढले आहे.
गेल्या १० दिवसांत जिल्हाभर चोरीच्या १६ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या घटना घडत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
कळंब शहरातील व्यापारी अजय हरकचंद कर्नावट यांना दरोडेखोरांनी मारहाण करून सोन्याची साखळी लंपास केली. यावेळी त्यांनी आरडाओरड केली म्हणून चोरट्यांचा दरोडा फसला होता. या दरोड्याची तक्रार घ्यायला पोलीस तयार नव्हते. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पीएने पोलीस अधीक्षकांना फोन केल्यानंतर सूत्रे हालली होती. पोलिसांनी एक भुरटा चोर अटक केला असून, मुख्य दरोडेखोर अद्याप फरार आहेत.
गेल्या चार दिवसात झालेल्या चोऱ्या
उस्मानाबाद - ओल्टास टिअर या कंपनीचा उस्मानाबाद शहरालगत वरुडा रोड उड्डान पुलाजवळ विद्युत साहित्य पुरवठा केंद्र आहे. त्या केंद्रातील एका विद्युत कंडक्टर ड्रम मधील 50 कि.ग्रॅ. ॲल्युमिनीअम तारा दि. 19.11.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या सुरक्षा रक्षक- रोहन विनायक गाढवे, रा. वरुडा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: जावेद लालमहंमद मुजावर, रा. वत्सला नगर, अणदुर, ता. तुळजापूर हे कुटूंबीयांसह राहत्या घरी दि. 16 व 17.11.2020 दरम्यानच्या रात्री झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील भींतीवरुन घरात प्रवेश करुन आतील रेडमी व विवो असे दोन मोबाईल फोन व 7,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या जावेद मुजावर यांनी काल दि. 17.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी: उत्तरेश्वर अजिनाथ साबळे, रा. तिंत्रज, ता. भुम यांनी आपली हिरो मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 7620 ही दि. 16.11.2020 रोजी रात्री 22.30 वा. सु. राहत्या घरासमोर ठेवली होती. ती मोटारसायकल दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे न आढळल्याने ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या उत्तरेश्वर साबळे यांनी काल दि. 17.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी: हनमंत तानाजी गोरे, रा. दहिवडी, ता. तुळजापूर यांच्या दहिवडी सर्वे क्र. 429 मधील शेतातील सोयाबीनचे 5 पोते दि. 24.10.2020 रोजी 06.30 ते 09.30 वा. सु. अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या हनमंत गोरे यांनी आज दि. 18.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS