वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
कळंब ( विशाल कुंभार ) - कळंब शहरात वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. खरेदीसाठी आलेले लोक चक्क रत्यावर वाहन लावत असून, यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे तर अनेकजण रत्यावर कचरा फेकत असलेल्या कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
सत्तेत येण्यापूर्वी नागरिकांना मोठे मोठे आश्वासन देण्यात येते मात्र सत्तेत आल्यानंतर शहरातील विकास कामांना व नागरिक व्यापारी यांच्या अडचणी लक्षात घेत नसल्याचं दिसून येत असून कळंब शहरातील वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न मिटत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
कळंब शहरात गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर लागणाऱ्या दुचाकी गाड्या व वाहन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासन अमसर्थ दिसत आहे.शहरात दुचाकी वाहनाला पार्किंगचे नियोजन नसल्याने शहरात येणारे वाहनधारक हे कुठेही गाडी लावतात आणि खरेदी करतात याचा नाहक त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.नगर परिषद प्रशासनाने सम विषम तारखेप्रमाणे गाडी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
कळंब शहरात मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खरेदी करण्यासाठी येतात.व्यापाऱ्यांच्या दुकाना समोर दुचाकी गाडी पार्किंग असल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय होत नाही.नगर परिषद प्रशासनाला वारंवार मागणी करुन सुद्धा दुचाकी पार्किंग चा प्रश्न मार्गी लागत नाही.
नगर परिषदचे मुख्यधिकारी यांना पार्किंगच्या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ नसल्याने कळंब शहरातील व्यवसायकाना दुचाकी पार्कींग चा त्रास सहन करावा लागणार आहे असे दिसत आहेत तर निवडणुकीच्या वेळी आश्वासन देऊन निवडून आलेले प्रतिनिधी तरी व्यापाऱ्यांच्या मदतीला येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मेन रोडवरील बेकायदेशीर पार्किंग मुळे व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होत आहे.यासाठी नगरपरिषदेने सम-विषम पार्किंग सुरू केले पाहिजे.
ऊस व जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कळंबची ओळख आहे ते नावलौकिक व्यापारी वर्गाने कायम ठेवले आहे आता गरज आहे नगर परिषद व्यापारीवर्गाला सहकार्य करण्याची यासाठी नक्कीच नगरपरिषद पुढाकार घेईल अशी आशा आहे -हर्षद अंबुरे. व्यापारी कळंब
COMMENTS