उस्मानाबाद- खरीप हंगाम २०१८ मध्ये सोयाबीन पिकाच्या विम्यापोटी उस्मानाबाद जिल्ह्याला सुमारे ३७५ कोटी हुन अधिकचा विक्रमी विमा आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे. अल्पपर्जन्यमान व संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरावा असे आवाहन त्यावेळी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ३२६३६० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात २ लाख ७४ हजार १९५ हेक्टर वरील सोयाबीन पिकासाठी तब्बल २२ कोटी ८७ लाख रुपयाचा पीकविमा हफ्ता भरला होता. सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय पथकाकडे लवकर मदत मिळण्यासाठी नेहमी तकादा लावला होता. या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले असून आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भलीमोठी रक्कम मिळवून देण्यात यश आले आहे.
खरीप हंगाम २०१७ मध्ये उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकऱ्यांना
प्रशासनाच्या चुकीमुळे पीकविमा मिळण्यापासून वंचित राहावे लागले
होते.त्यामुळे यावेळी पिक कापणी प्रयोग सुरु असताना उंबरठा उत्पन काढते
वेळी काळजी घेतली गेली होती. शेतकऱ्यांनी पिक कापणी प्रयोगावेळी शेतात
आवर्जून थांबावे व वस्तुनिष्ठ अहवाल पाहूनच त्यावर स्वाक्षरी करावी असेही
आवाहन त्यावेळी केले होते. त्यामुळेच जिल्ह्यासाठी घवघवीत विमा रक्कम
मिळण्यास मदत झाली आहे.
येत्या ४- ५ दिवसात सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे यामुळे दुष्काळामुळे त्रस्त असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.
उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील खरीप २०१७ मध्ये प्रशानाच्या चुकीमुळे पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या ७५००० शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सध्या मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सुनावणी चालू आहे व या शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे.

COMMENTS