तुळजापूर - तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या शिष्टमंडळाने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरला भेट देऊन विठ्ठल मंदिर च्या नव्या दगडी गाभाऱ्याची पाहणी केली. यावेळी शिष्टमंडळाने विठ्ठल मंदिरचे दर्शन मंडप, व्हीआयपी पासेस, गावकरी दर्शन सुविधा आदींची पाहणी करून मंदिर समितीच्या वतीने भक्तांना देण्यात येत असलेल्या सोयीसुविधांची माहिती घेतली.
तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा तयार करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान च्या शिष्टमंडळाने गुरुवार (दि. २७) पंढरपूर च्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरला भेट देऊन माहिती घेतली. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान चे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले, मंदिर संस्थान चे अभियंता राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, पुण्याचे वास्तुविशारद हेमंत पाटील, सल्लागार स्ट्रक्वेल कंपनीचे अभियंता आदिंचा समावेश होता.
प्रारंभी शिष्टमंडळाने विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या पुरातन विभागाच्या देखरेखेखाली विठ्ठल मंदिरचा नव्याने झालेला दगडी गाभाऱ्याची पाहणी केली. यावेळी विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांत अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर देवस्थानचे व्यवस्थापक बालाजी पुदोलवार यांनी माहिती दिली. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा भविष्यातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन, पार्किंग व्यवस्थेसह दर्जेदार मुलभुत सुविधा देण्यासाठी सर्वकष विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या साठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील तीर्थक्षेत्रांची मंदिर संस्थान कडून पाहणी करण्यात येत आहे.
यापूर्वी तिरूपती, शिर्डी देवस्थानला दिली भेट तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा सर्वंकष करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे प्रयत्नशील असून यासाठी मंदिर संस्थान चा पथकाने यापूर्वी तिरूपती बालाजी, शिर्डी देवस्थान ला भेटी देऊन भक्तांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. याशिवाय मंदिर संस्थान ने पंढरपूर कॉरिडॉरची ही माहिती घेतली आहे. ११७० कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या मंदिरातील विविध विकास कामाचा समावेश असणार असून दुसऱ्याच टप्प्यात मंदिरा बाहेरील विकास कामे करण्यात येतील. मंदिरातील विकास कामे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित करण्यात येणार आहेत. यानंतर मंदिराचा चेहरामोहरा बदलेल.
COMMENTS